कोरोना -कोविड -19 या संसर्गजन्य आजाराच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसावा याचा एक भाग म्हणून आणि कंटेनमेंट झोन मधील कुटुंबांतील सदस्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून या कुटुंबांना दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमधून अर्सेनिक अल्बम -30 या होमिओपॅथी औषधाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. सदर वितरण हे स्वयंसेवक यांचेमार्फत करण्यात येणार आहे. याबाबत अध्यक्ष,जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,जळगाव तथा incident commander यांनी संबंधित तहसिलदार यांना पत्र दिले आहे.
Loading...