महसूल व वन विभागाच्या दिनांक १९/०३/२०२५ च्या शासन निर्णयानुसार जीवंत ७/१२ उतारा ही मोहीम दिनांक ०१ एप्रिल,२०२५ पासून राबविण्यात आली आहे.या मोहिमेत सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी bit.ly/3GDb1FA
आता याच मोहिमेच्या दुसर्या टप्प्याबाबत दिनांक ३० एप्रिल,२०२५ रोजी शासन निर्णय झाला आहे.या मोहिमेमध्ये
१) अपाक शेरा कमी करणे,
२)एकुमॅ नोंद कमी करणे,
३)कालबाह्य नोंदी कमी करणे जसे :- तगाई कर्ज, भुसुधार कर्ज, इतर पोकळीस्त नोंदी,
४)भूसंपादन निवाडा व बिनशेती आदेशानुसार प्रलंबित कजापचा अंमल ७/१२ सदरी घेणे,
५)पोट खराब वर्ग “अ” खालील क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात रुपांतरित करुन ७/१२ सदर घेणे,
६)नियंत्रित सत्ता प्रकार शेरे प्रकार निहाय पडताळणी करून ७/१२ सदरी अमल घेणे,
७)भोगवटादार वर्ग १ भोगवटादार वर्ग २ असे स्वतंत्रपणे भूधारणा प्रकारनिहाय ७/१२ तयार करणे,
८)अंतिम निस्तार पत्रकानुसार स्मशानभूमी व इतर निस्तार हक्काच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेतल्या जाणार आहेत.
कालबाह्य नोंदीमुळे शेतकर्यांना जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे, भूसंपादन मोबदला इत्यादी कामकाजावेळी अडचणी निर्माण होतात. कालबाह्य आणि अनावश्यक नोंदी कमी झाल्यामुळे या अडचणी कमी होऊन जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीचे वाद कमी होण्यास मदत होणार आहे आणि शासकीय योजना आणि विकास कामांसाठी जमिनीची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे.
सदर शासन निर्णय पुढील लिंक वर क्लिक करून पाहता येईल.