Spread the love

तलाठी पदाच्या एकूण ४६४४ जागा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत ३६ जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्याबाबत जमाबंदी आयुक्त आणि संचालक,भूमी अभिलेख,महाराष्ट्र राज्य यांचेकडून नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सदर भरतीसाठी उमेदवारांची जिल्हानिहाय रिक्त पदांची संख्या,आरक्षण,पात्रता ,अर्जसोबत जोडायची कागदपत्रे इ.बाबत सविस्तर सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. परीक्षा ही एकूण १०० प्रश्न व २०० गुणांची राहणार आहे. यात मराठी,इंग्रजी,सामान्य ज्ञान,बौद्धिक चाचणी इ. विषयांवर प्रश्न विचारले जाणार आहेत.

अर्ज सादर करण्याचा कालावधी – दिनांक २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३ वेळ २३.५५ अशी राहणार असून परीक्षेचा दिनांक https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर नंतर उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

तलाठी पदभरती २०२३