Spread the love

दिनांक ०१ ऑगस्ट ,२०२२ रोजी स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव व महसूल दिनाचे 

औचित्य साधून पारोळा तहसील कार्यालय,पारोळा तलाठी संघ व महसूल संघटना यांचे संयुक्त सहभागाने पारोळा तहसील कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर उपक्रमात एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी नायब तहसिलदार बी शिंदे,राहुल मुळीक,शहर तलाठी निशिकांत माने हे उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.