एक आदर्श तलाठी कसा असावा हे दाखविणारी ही एक छोटी फिल्म . आपले कर्तव्य हाच परमेश्वर मानणार्या तलाठी चे चित्रण या फिल्म मधून आपल्याला पाहावयास मिळेल. कामाच्या व्यापात आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते म्हणून हळहळणारा कुटुंब प्रमुख तर गरीब श्रीमंत असा भेद न करता आलेल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणारा असा तलाठी आपणास पाहावयास मिळेल.
तलाठ्याचा संघर्ष,मनोव्यथा समजून घ्यायची असेल तर नक्की पहा !!