जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या “लिपीक” पदाचे पदनाम आता “महसूल सहाय्यक” करण्यात आलेले आहे.
याबाबत दिनांक २०/०८/२०२० रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
महसूल विभागातील गट-क संवर्गातील “लिपीक” पदाचे पदनाम बदलून “महसूल सहाय्यक “ असे करण्याबाबतची मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारे बर्याच कालावधी पासून करण्यात येत होती.सदर मागणी मान्य झाल्याने संघटनेच्या मागणीस यश मिळाले आहे.
सदर शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे.