सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणेकामी व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,गतिमान व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सन २०१५ पासून राज्यात महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान या वर्षी म्हणजेच ०१ ऑगस्ट,२०२० ते ३१,जुलै,२०२१ या कालावधी दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने शिवार फेरी,फेरफार अदालत,अनधिकृत अकृषिक प्रकरणे शोधणे,अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा करणे,अतिक्रमित शीव रस्ते,पाणंद रस्ते मोकळे करणे व इतर बाबींचा समावेश आहे. त्याबाबत दिनांक ०७,सप्टेंबर,२०२० रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
शासन निर्णय