केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या 18 ते 59 वय दरम्यानच्या कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्यास त्या कुटुंबाला रु. 20,000/- इतके अर्थसाहाय्य देण्यात येते. सदर योजेतील लाभार्थी यांनी कुटुंबप्रमुख किंवा कुटुंबातील प्रमुख कमविता व्यक्ती मयत झालेपासून एक वर्षाचे आत अर्ज सादर करणेची मुदत होती.
दिनांक 21 सप्टेंबर 2020 चे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील परिपत्रकानुसार आता येथून पुढे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थी यांना अर्ज सादर करणेसाठीची कुटुंबप्रमुख मयत झालेपासून एक वर्षावरून 3 वर्ष अशी वाढविण्यात आलेली आहे.