ॲग्रिस्टॅक (Agristack) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास कृषि,पशुसंवर्धन व दु.वि. मंत्रालयाकडून शासन निर्णय संकीर्ण -२०२४/प्र.क्र.१५७/१० -अे,दिनांक १४/१०/२०२४ अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे या योजनेची उद्दिष्ट्ये ही,राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे,राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे.,शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व सोपी पद्धत विकसीत करणे तसेच प्रमाणिकरणाची सुलभ पद्धत विकसित करणे,राज्यातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषि व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे इ. आहेत.
सदर योजनेबाबत अधिक माहिती आपण पुढील दुव्यांवर क्लिक करुन मिळवू शकता.
१) शासन निर्णय संकीर्ण -२०२४/प्र.क्र.१५७/१० -अे,दिनांक १४/१०/२०२४
२) शेतकरी स्वयं नोंदणी प्रक्रिया
३) ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) स्तरावरील नोंदणी
४) नागरी सेवा केंद्र (CSC) मार्फत अंमलबजावणी पत्र दिनांक २१/०१/२०२५
५) ॲग्रिस्टॅक योजनेबाबत संपूर्ण माहिती (पीपीटी)
६) नागरी सेवा केंद्र (CSC) मार्फत अंमलबजावणी बाबत व्हिडीओ
७) शेतकरी संच (FARMER ID) नोंदणीकरिता संकेतस्थळ