उपयुक्त व्हिडीओज

Spread the love

daneappa
तलाठी आणि Youtuber
महादेव दाणे

श्री महादेव दाणे हे महाराष्ट्र शासन,महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तलाठी यांच्या दैनंदिन कामकाजाशी निगडीत मार्गदर्शनपर व्हिडीओ तयार करण्यात ते कुशल असून यूट्यूब वर TalathiMitra नावाचे त्यांचे चॅनल आहे. दाणे आप्पांनी तयार केलेले व्हिडीओ हे तलाठी यांना खूपच उपयुक्त ठरत आहेत.

या पेजवर  TalathiMitra या चॅनल वरील नवनवीन व्हिडीओ शेअर करण्यात येतील. 

शेतजमिनीचे स्थानिक नाव ऑनलाइन 7/12 उतार्‍यावर दाखल करणे

https://youtu.be/gqyXxgUCXhU


गावातील शेतजमिनीला पूर्वी पासून स्थानिक नावाने ओळखण्याची जुनी पद्धत आहे. उदा. इनामावाले,बेहेडयावाले,गारगोटीवाले इ. एखाद्या शेतकर्‍याला त्याच्या शेतीचा गट क्रमांक/सर्वे क्रमांक अचूक सांगता येईलच असे नाही. परंतु तो त्याची शेती स्थानिक नावाने मात्र अचूक सांगतो. अशा स्थानिक नावाची नोंद गाव नमुना 7/12 वर पूर्वीपासून नमूद असते. परंतु सदर नोंद अद्यापही ऑनलाइन 7/12 उतार्‍यावर घेतली गेलेली नसेल तर ते स्थानिक नाव अद्ययावत करण्याबाबत या व्हिडीओ  मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. 

नोटीस दिल्याची तारीख व हरकतीचा शेरा ऑनलाईन भरणे

https://youtu.be/_fKIGuhPQxQ


महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 150(2) आणि अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे नियम,1971 मधील नियम 14 अन्वये नमुना 9 मधील नोटीस सर्व हितसंबंधितांना बजविल्यानंतर नोटीसा बजवल्याचा दिनांक आणि विहित मुदतीत जर हरकत प्राप्त झाली असेल तर हरकतीचा शेरा ऑनलाइन ई-फेरफार प्रणाली मध्ये कसा भरावा याबाबत या व्हिडीओ मध्ये मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. 

म.ज.म.अधि. 1966 चे क. 150(2) नमुना 9 मधील नोटीस तयार करणे

https://youtu.be/sAEagJyRlOE


महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 150(2) आणि अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे नियम,1971 मधील नियम 14 अन्वये नमुना 9 मधील नोटीस ऑनलाइन ई-फेरफार प्रणाली मध्ये कशी तयार करावी याबाबत या व्हिडीओ मध्ये मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. 

बिनशेती वर्ग झालेला ७/१२ बंद करून नवीन बिनशेती ७/१२ तयार करणे !

https://youtu.be/zVieB4KDICE


कृषक जमिनीला बिनशेती वापरास सक्षम अधिकारी यांचेकडून परवानगी दिली जाते. यात साधारणतः दोन टप्पे असतात. प्रथम सक्षम अधिकारी विविध कायदे/नियम यांचे अधीन राहून शेतजमिनीला  अकृषिक वापराकडे वर्ग करण्यास परवानगी देतात. त्यानंतर सदर जमिनीची  मोजणी होऊन नगर रचना विभागाकडून अंतिम अभिन्यासास मंजूरी दिली जाते. त्यानुसार सक्षम अधिकारी मूळ कृषक ७/१२ उतारा बंद करुन अंतिम अभिन्यासाप्रमाणे नवीन भूखंडाचे(प्लॉट) चे ७/१२ उतारे तयार करण्याचे तलाठी यांना आदेशित करतात. हा  जुना ७/१२ बंद करुन नवीन प्लॉटस चे ७/१२ कसे तयार करावे याबाबत या व्हिडिओ मध्ये मार्गदर्शन केले आहे.