तलाठी मित्रांसाठी !
मित्रहो,उद्या पासून म्हणजेच १ ऑगस्ट,२०२२ पासून नवीन महसूली वर्षामध्ये ई पीक पाहणी App आवृत्ती २.०० सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक पहाणीची नोंद करणेसाठी उपलब्ध होत आहे. “माझी शेती माझा सात बारा,मीच नोंदविणार माझा पीक पेरा” हे ब्रीद वाक्य घेऊन मागील वर्षापासून ई पीक पाहणी App च्या वापरास सुरुवात झाली आहे. त्यात नवीन आवृत्तीमध्ये बर्याच सुधारणा केलेल्या आहेत. या नवीन सुविधा कशा वापराव्या याबाबत पुढे व्हीडीओ दिलेले आहेत.