Spread the love

मित्रहो,

ई पीक पाहणी app चे नवीन व्हर्जन २.०० हे आता डाऊनलोड करून पीक पाहणी भरणेसाठी उपलब्ध झालेले आहे. या नवीन App मध्ये पुढील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

1. ई. पीक पाहणी शेतकर्‍यांद्वारे स्वयं प्रमाणित मानण्यात येणार आहे. 
2. किमान 10% तपासणी तलाठी यांचेमार्फत
3.Geo Fencing सुविधा.
4. 48 तासात खातेदार स्वतः पीक पाहणी दुरुस्त करू शकतात.
5. संपूर्ण गावाची पिक पाहणी पाहण्याची सुविधा.
6 किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत संमती नोंदविण्याची सुविधा
7. मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक पिके नोंदविण्याची सुविधा
8. तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविताना मागील पिक पाहणी कायम ठेवण्याची सुविधा

तरी आपण पुढील लिंक्स वरुन डाऊनलोड करु शकता.

ई पीक पाहणी डाऊनलोड लिंक १ (ई पीक पाहणी व्हर्जन टू ॲप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर लिंक)

https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova

 

ई पीक पाहणी डाऊनलोड लिंक २ – महाभूमी पोर्टल वरुन डाऊनलोड 

https://epeek.mahabhumi.gov.in/pun/android_app/app-release_1.apk

 

आपल्या मोबाइल मध्ये पुढे दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा आणि प्लेस्टोअर वरुनही app डाउनलोड करता येईल.