SEC
Spread the love

ग्रामपंचायत आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नामनिर्देशन पत्र सादर करतांनाच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केलेले होते.

परंतु आता महाराष्ट्र शासन,ग्रामविकास विभाग यांनी दिनांक २८ एप्रिल,२०२३ रोजी अध्यादेश काढून या स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी करणार्‍या उमेदवारास दिलास दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश,२०२३ मध्ये नमूद केल्यानुसार ३१  ,डिसेंबर,२०२३ पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल होणार्‍या ग्रामपंचायत अथवा जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकांसाठी सदस्य/सरपंच/पं.स.सदस्य/जि.प.सदस्य यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसल्यास नामनिर्देशनपत्रासोबत जात पडताळणी समिती कडे अर्ज केल्याचा पुरावा आणि निवडून आल्यापासून १२ महिन्याच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणेबाबत हमीपत्र सादर करावे लागणार आहे. 

सदर अध्यादेश पहाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश,२०२३