SEC
Spread the love

दिनांक १ जानेवारी १९९५ किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तीस ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक अथवा पोट निवडणुकीसाठी  सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी आता किमान ७ इयत्ता उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. यापूर्वी सन २०१८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारासाठी किमान ७ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली होती. 

दरम्यान सदस्य पदासाठी सुद्धा काही किमान शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे का याबाबत आता आज दिनांक २५/११/२०२२ रोजी ग्रामविकास विभागाकडून आज स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. त्यानुसार दिनांक ०१/०१/१९९५ नंतर जन्मलेल्या व्यक्तीस सार्वत्रिक अथवा पोट निवडणुकीत सरपंच अथवा सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल करायचे असेल तर किमान ७ इयत्ता उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. 

सरपंच अथवा सदस्य यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत पत्र दिनांक २५/११/२०२२ 

 

हे ही वाचा ⇒  थेट सरपंच निवड अध्यादेश २७/०७/२०२२