Spread the love

 

 

 

 

कोरोना विषाणूच्या साथी विरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मध्ये समाजाच्या विविध घटकांकडून आर्थिक मदत देणगी स्वरुपात दिली जात आहे.

त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड -19 या नावाने स्टेट बँकेत खाते उघडून मदतीची रक्कम जमा केली जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी,निमशासकीय कर्मचारी संघटना यांनी सुद्धा सदर निधी मध्ये आपले योगदान देणेबाबत शासनाकडे निवेदने दिलेली होती.

 

त्या अनुषंगाने आज कर्मचार्‍यांच्या माहे मे,2020 च्या वेतनातून एक किंवा दोन दिवसाचा पगार वजा करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड -19 मध्ये जमा करणेबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download