राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२३-२०२४ चे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय कर्मचारी या प्रवर्गामधून मंडळ अधिकारी,खिरोदा ता.यावल जिल्हा जळगाव श्री जनार्दन बंगाळे (हल्ली मंडळ अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय,बुलढाणा ) यांच्या ” दाखल्यांची शाळा “या उपक्रमास शासनाने गौरवान्वित केले आहे.
उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना एकाच छताखाली जात प्रमाणपत्र,नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र इ. दाखले तयार करून वितरित करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे श्रम,वेळ व पैशाची बचत तर झालीच पण नवीन शालेय सत्र सुरू झाल्यावर प्रशासनावर येणारा कामाचा अतिरिक्त बोजा ही कमी झाला.
हा जनताभिमुख उपक्रम राबविण्याबाबत श्री जनार्दन बंगाळे यांची भूमिका त्यांच्याच शब्दात पुढीलप्रमाणे –
उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात, शाळेत विविध दाखले मिळावे यासाठी मंडळातील सर्व शाळात राबवलेल्या “दाखल्यांची शाळा” या नाविन्यपुर्ण उपक्रमाकरिता आज राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाने तर्फे कर्मचारी श्रेणीत 2023-24 या वर्षातील जो पुरस्कार घोषीत झाला त्याबद्दल आपण जे माझे अभिनंदन केले त्याबद्दल मी सर्वांचा मनपुर्वक आभारी आहे.🙏🏻😊
नाविन्यपुर्ण उपक्रमाच्या निमित्ताने….
शाळा,महाविद्यालय या ठिकाणी प्रवेश घेणे,शिष्यवृत्तीचा लाभ मिळवणे अथवा सरकारी नोकरी साठी अर्ज दाखल करणे यासाठी जातीचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी दाखल्यांची आवश्यकता असते.परंतु शालेय जिवनात या दाखल्या बाबत पुरेसी माहिती विद्यार्थ्यांना नसते व त्यामुळे जेव्हा शाळा,महाविद्यालय यांच्याकडून प्रवेशासाठी अथवा शिष्यवृत्तीसाठी या दाखल्यांची मागणी करण्यात येते, तेव्हा विद्यार्थी व पालक यांची धावपळ सुरु होते.त्यामध्ये प्रामुख्याने जातीचे जुने पुरावे शोधण्यापासून ते अर्ज दाखल करण्यापर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश आहे.यात काही वेळा मध्यस्थ व्यक्तीकडून आर्थिक लुबाडणूकही केली जाते.असा सर्व सामान्य अनुभव आहे.त्यामुळे शालेय स्तरावरच दाखले नोंदणीचे शिबीर आयोजित करून दाखल्यांचे वितरण करण्यासाठी मंडळातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मध्ये उन्हाळी सुट्टीत “दाखल्यांची शाळा”हा उपक्रम राबविण्यात आला.
“दाखल्यांची शाळा” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे हेतू :-
➡️ दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालक यांची होणारी धावपळ थांबवणे.
➡️एका छताखाली सर्व दाखले उपलब्ध करून देणे.
➡️मध्यस्थ व्यक्तीकडून विद्यार्थी व पालक यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवणे.
➡️विद्यार्थी – पालक यांच्या श्रमाची व पैश्याची बचत करणे.
➡️लोकाभिमुख प्रशासन राबवणे व रुजवणे.
या उपक्रमातून ग्राम महसूल अधिकारी यांचे स्तरावरील उत्पन्न अहवाल व शाळेडील बोनाफाईड प्रमाणपत्र मिळून 476 दाखले विद्यार्थ्यांना जागेवर उपलब्ध करून देण्यात आले तर जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी मिळून 680 दाखल्यांची नोंदणी करण्यात आली. व विद्यार्थ्यांना दाखले वितरण करण्यात आले.यामुळे शासकीय सेवांचा लाभ विद्यार्थ्यांना गाव पातळीवर एकाच छताखाली मिळाला.
या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य त्याच प्रमाणे शालेय प्रशासनाचे सहकार्य व सहभाग असणे आवश्यक होते.सर्व शाळांच्या मुख्याध्यापकानी व शालेय प्रशासनाने उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
गाव पातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक,ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोठ्याप्रमाणावर प्रचार व प्रसिद्धी केली.प्रत्यक्ष उपक्रमाच्या दिवसी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मदत करणे,मार्गदर्शन करणे इत्यादी कामकाज पार पाडले.
आपले सरकार केंद्राचे चालक यांनी त्यांचा सर्व सेटअप शिबिराच्या ठिकाणी आणून दाखल्यांचे नोंदणी केली आणि आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले.फैजदारी संकलनाचे महसूल सहाय्यक, सहाय्यक महसूल अधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य या उपक्रमासाठी मिळाले.
वरिष्ट अधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन व मुख्याध्यापक,शालेय प्रशासन,ग्राम महसूल अधिकारी ,ग्रामपंचायत पदाधिकारी, महसूल सेवक,आपले सरकार केंद्राचे चालक इत्यादी घटकांचे सहकार्य व समन्वय यातूनच विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या दाखल्यांची नोंदणी करण्यात येऊन 1156 दाखल्यांचे वितरण करण्यात आले.व “दाखल्यांची शाळा”हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी होवू शकला.
उप्रकमासाठी सहकार्य व मार्गर्शन करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद…!राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२३-२०२४ शासन निर्णय