लॉक डाऊन कालावधी मध्ये महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात मजूर/विद्यार्थी यात्रेकरु वा नागरिक अडकून पडलेले आहेत. त्यांना त्याचे मूळ गावी पोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी ची मोफत सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 09/05/2020 रोजी आणि परप्रांतीय नागरिकांना रेल्वे ने जाण्यासाठी चा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून करणेबाबतचा शासन निर्णय दिनांक 10 मे,2020 रोजी घेण्यात आलेले आहेत.
सदर निर्णयांची मुदत आता दिनांक 31 मे, 2020 पर्यंत वाढविण्यात आलेले आहे. त्याबाबतचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे.
शासन निर्णय