लॉक डाऊन कालावधी मध्ये महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात मजूर/विद्यार्थी यात्रेकरु वा नागरिक अडकून पडलेले आहेत. त्यांना त्याचे मूळ गावी पोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी ची मोफत सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक 09/05/2020 रोजी झालेला आहे.
त्यानुसार राज्याच्या सीमेपर्यंत इतर राज्यातून आलेल्या व राज्यान्तर्गत असलेल्या नागरिकांना त्यांच्या गावापर्यंत एस टी ने मोफत पोहोचविण्याची सुविधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
शासन निर्णय