ज्या शेतकऱ्यांची नावे शेतकरी यादी (फार्मर लिस्ट) मध्ये नाहीत किंवा जुने किंवा चुकीचे रेकॉर्ड दिसत असल्यास अलीकडे जमीन खरेदी-विक्री केल्यामुळे नवीन ७/१२ (सातबारा) मिळालेला आहे. संयुक्त ७/१२ मध्ये नाव नोंद झाल्याचे अपडेट अजून नाही.
अशा शेतकऱ्यांसाठी ‘माय नेम इज नॉट इन लिस्ट ‘या पर्यायावर क्लिक करून संबंधित शेतकऱ्याचा तपशील टाकावा. त्यानंतर त्याचा फार्मर आयडी प्रणालीमध्ये तयार होतो. यामुळे त्या शेतकऱ्याचा ‘अॅग्री स्टॅक’ अंतर्गत नोंदणी प्रक्रियेत समावेश करता येणार आहे. ही प्रक्रीया शेतकऱ्यांना जवळच्या CSC सेंटरवर जाऊन करावी लागणार आहे.
शासनाच्या अॅग्री स्टॅक उपक्रमामुळे शेतकऱ्यांना डिजिटल आधारावर योजना, पिकविमा, पीएम किसान सन्मान योजना आदी योजनेत सहभागी होणे व लाभ मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.
