Spread the love

विषय – DSC नवीन व नुतनीकरण साठी जिल्हा सेतू समिती फंडातून खर्च करणे बाबत .

नमस्कार मित्रांनो ,

               विषय – DSC नवीन व नुतनीकरण साठी जिल्हा सेतू 
                           सोसायटी फंडातून खर्च करणे बाबत .

ई फेरफार प्रणालीत वापरणेत येणारी डिजिटल सिग्नेचर (DSC) पहिल्यांदा खरेदी करणेसाठी शासन स्थारावरून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता . त्यानंतर त्याचे नुतनीकरण करणे बाबत तत्कालीन प्रधान सचिव महसूल श्री. विकास खारगे साहेब यांचे दिनांक ६ नोव्हेंबर ,२०१५ रोजी च्या सर्व जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या अर्ध शासकीय पत्राद्वारे मार्गदर्शन केले आहे त्याचे अवलोकन होण्यास विनंती आहे .

                             शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग , क्र. मातसं नस्ती ०७/३७/३९ दिनांक १०/१०/२०११ मधील ३ अ (१५) व ३ब (८) येथे नमूद केलेल्या तरतुदी विचारात घेवून जिल्हा सेतू सोसायटी कडे उपलब्ध असणाऱ्या निधीचा विनियोग करून डिजिटल सिग्नेचर खरेदी करणे व मुदत संपलेल्या डिजिटल सिग्नेचरचे पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करण्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन या अर्ध शासकीय पत्रात केले आहे 

                              राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने  डिजिटल सिग्नेचर  देण्याचे बंद केल्या नंतर जिल्हा स्थरावर वेगवेगळ्या  सेवा पुरवठा  कंपन्या  कडून खरेदी केल्या आहेत तरी त्यासाठी किंवा त्याच्या नुतनीकरण  करणेसाठी  वेग वेगळे दर वापरले जात आहेत . काही ठिकाणी हे नूतनीकरण तलाठी मंडळ अधिकारी  यांनी स्वताच करावे असा आग्रह धरला जातो हे योग्य नाही . त्यासाठी जिल्हा सेतू समिती च्या निधीचा विनियोग करणेत यावा .

राज्यस्थरावर अनेक सेवा पुरवठादारांकडून दरपत्रक मागविले असता त्यामध्ये खूपच तफावत दिसून येते त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे डिजिटल सिग्नेचर चे सर्वात किफायतशीर दरपत्रक सोबत जोडले आहे त्यांचेशी संपर्क करून नवीन डिजिटल सिग्नेचर खरेदी असेल किंवा त्यांचे नुतनीकरण असेल तरी त्याचा उपयोग करायला हरकत नाही  .

आपल्या जिल्ह्यात N-CODE , E-MUDRA , E PASS , CEFI , CAPRICORN ,किंवा V-SIGN या पैकी कोणत्याही कंपनी चे डिजिटल सिग्नेचर असेल तरी त्याचे नुतनीकरण ( टोकन शिवाय ) रक्कम रुपये २५० /-  व टोकन सह नवीन खरेदी  रक्कम रुपये ३५०/- पेक्षा कमी किमतीला होवू शकते ह्याची नोंद घ्या . फक्त टोकन खराब झाले असल्यास ते रक्कम रुपये १२०/- किमतीलाच मिळेल असेही या कोटेशन मध्ये म्हतावे आहे तसेच एकाच वेळी १०० पेक्षा जास्त DSC ची ऑर्डर दिल्यास १०% सवलत दिली जाईल असेही त्यात नमूद आहे . या बाबत सर्व डी डी ई यांनी सेवा उपलब्धतेची गुणवत्ता व तत्परता पाहून योग्य ती कार्यालयीन कामकाजाची पद्धती पाळून कार्यवाही करावी ही विनंती .

आपला 
रामदास जगताप 
दि.३०.४.२०२० 

 

Registration Form for Digital Signature