जळगाव जिल्ह्यातील जळगाव महानगर पालिका क्षेत्र हे अजूनही रेड झोन मध्ये आहे तर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्र हे नॉन -रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयासाठी लॉकडाऊन चा कालावधी दिनांक ३१ जुलै, २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये कोणत्या गोष्टी सुरू राहतील आणि कोणत्या बंद राहतील त्याबाबत मा.जिल्हाधिकारी यांचेकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.