Spread the love

मयत शेतकरी खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने वारसाची नोंद अधिकार अभिलेखात विहित वेळेत न झाल्याने अडचणीना सामोरे जावे लागते. या दृष्टीकोनातून संपूर्ण राज्यात ” जीवंत सातबारा मोहिम ” राबविली जाणार आहे. सदर मोहिम राबविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. त्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक १९ मार्च,२०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर कालबद्ध कार्यक्रम १ एप्रिल,२०२५ ते १० मे,२०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

 

अर्जदार यांनी त्यांचे अर्ज ई हक्क प्रणाली मार्फतच ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे पाठवायचे आहेत.

ई हक्क प्रणालीचे संकेतस्थळ   https://pdeigr.maharashtra.gov.in/  हे आहे . 

सदर शासन निर्णय पुढील लिंक वर क्लिक करून पाहता येईल. 

जीवंत सातबारा शासन निर्णय 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *