COVID19 च्या लॉकडाऊन मुळे नक्कल फी जमा करण्याची मुदत शिथिल करणे बाबत .
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला , नवीन प्रशासकीय इमारत , विधान भवन समोर , कॅम्प , पुणे 1
दूरध्वनी क्र. ०२०–२६१३७११० Email ID : [email protected]
Web site: https://mahabhumi.gov.in
———————————————————————————————————————
क्रमांक : क्र.रा.भू.4/ मा.सु. १३५ /२०२० दिनांक : 31/03/2020
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व).
विषय – COVID19 च्या लॉकडाऊन मुळे नक्कल फी जमा करण्याची मुदत शिथिल करणे बाबत व १ एप्रिल, २०२० पासून अधिकार अभिलेख्यांची नक्कल फी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये न जमा करता बँक ऑफ बडोदा च्या व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) द्वारे जमा करणे बाबत.
संदर्भ – शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक.राभूअ-2019/प्र.क्र.366/ल-1. दिनांक २७ फेब्रुवारी,२०२०
DILMRP अंतर्गत ई-फेरफार प्रणालीत संगणकीकृत केलेले अधिकार अभिलेख ज्या मध्ये डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेला ऑनलाईन उपलब्ध करून देणेसाठी महाभूमि पोर्टल दिनांक २०.९.२०१९ पासून कार्यान्वीत केले आहे. या पोर्टल द्वारे सध्या डिजीटल स्वाक्षरीत गा.न.नं.७/१२ उपलब्ध करून दिला जात आहे. तथापि जे ७/१२ अद्याप डिजिटल स्वाक्षरीत झालेले नाहीत त्यासाठी तसेच ग्रामीण भागात सामान्य जनतेकडे इंटरनेट , संगणक , प्रिंटर उपलब्ध असेलच असे नाही सबब कोणताही संगणकीकृत गा.न.नं.७/१२,गा.न.नं.८अ आणि फेरफार उतारा तालाठी यांचे स्थरावरून वितरीत करण्यासाठी अभिलेख वितरण प्रणाली (DDM) विकसित करून मार्च २०१९ पासून क्षेत्रीय स्थरावर वापरात आहे. तलाठी स्थरावरून अशा प्रकारे वितरीत होणाऱ्या अधिकार अभिलेखांची नक्कल फी व त्यामधील तलाठी आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयाचा (महाभूमी) हिस्सा दि. ३१ जानेवारी, २०१९ च्या संदर्भीय शासन निर्णयान्वये निश्चित करून स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेजरी शाखा, पुणे येथील खाते क्रमांक – 38306827364 IFSC कोड न.- SBIN0001904 वर जमा करत आहेत तथापि याप्रमाणे भरलेल्या रकमांचा दरमहा ताळमेळ घेण्यासाठी रक्कम भरलेल्या पावत्यांच्या झेरॉक्स प्रती घेवून त्याचा ताळमेळ घेण्याचे काम संबंधित तालुक्याचे नायब तहसीलदार / तहसीलदार यांना करावे लागेत होते. त्यामध्ये तंत्रज्ञानाचा सहभाग घेवून हे ताळमेळ घेण्याचे काम सुलभ होण्यासाठी राज्यातील सर्व साजांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये व्हर्चुअल अकौंट (VAN) उघडण्यास शासनाने दिनांक २७.२.२०२० च्या संदर्भीय शासन निर्णयान्वये अनुमती दिली आहे.
व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) ही फक्त रक्कम हिशोबित करण्यासठीची सोय आहे. या खात्यावर जमा केलेली रक्कम थेट जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख यांचे नावे बँक ऑफ बडोदा, स्टेशन रोड शाखा, पुणे येथिल जमा खात्यावरच ( depository account) जमा होणार आहे. तथापि यामुळे फक्त कोणत्या साजेची किती रक्कम जमा झाली? हे ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे.
शासनमान्यते प्रमाणे राज्यातील प्रत्येक साजे साठी एक याप्रमाणे व्हर्चुअल अकौंट तयार करून त्याची तालुका निहाय यादी आपल्याकडे या पूर्वीच तपासणीसाठी पाठवली होती. आपण सुचविलेल्या दुरुस्त्या करून अंतिम केलेली साजा निहाय व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) ची यादी पुन्हा या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. राज्यातील सर्व तलाठी साजासाठी जिल्हा कोड व तालुका कोड प्रत्येकी तीन इंग्रजी अक्षरे व त्यानंतर सेन्सस LGD कोड वापरून १६ अंकी व्हर्चुअल अकौंट नंबर तयार केले आहेत ते योग्य असल्याची खात्री संबंधित डी.डी.ई. यांनी करावी. काही साजे वगळले गेले असतील अथवा काही साजे यांची नावे चुकली असल्यास तसे विभागीय समन्वयक (हेल्पडेस्क) यांचे मार्फत तात्काळ या कार्यालयाचे निदर्शनास आणून द्यावे.
बँक ऑफ बडोदा या बँके मार्फत वापण्यात येणाऱ्या अशा पद्धतीच्या व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) चा वापर करून राज्यातील तलाठी यांचे कडून अधिकार अभिलेखांची नक्कल फी जमा करून घेण्यासाठी खलील प्रमाणे कार्यपद्धती राहील. ज्या तालुक्यात अथवा नजीक बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँकेच्या शाखा असतील त्यांना बँकेत जावून रक्कम जमा करता येईल व अन्य ठिकाणी ही रक्कम ऑनलाईन जमा करता येईल.
१. कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाच्या (COVID19) पार्शभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु असल्याने माहे मार्च २०२० ची एप्रिल २०२० मध्ये बँकेत जमा करावयाची नक्कल फी जमा करावयाची ५ एप्रिल,२०२० ही मुदत २० एप्रिल,२०२० पर्यंत अथवा लॉकडाऊन बंद होईपर्यंत वाढविण्यात येत आहे.
२. सर्व तलाठी यांना अधिकार अभिलेख्यांची नक्कल फी जमा करण्यासाठी बँक काउंटर वरुन व ऑनलाईन असे दोन पर्याय असतील.
१अ) बँक काउंटर वरुन भरणा- बँक ऑफ बडोदा या बँकेच्या कोणत्याही शाखेच्या काउंटरवरुण थेट रोख रक्कम या खात्यावर जमा करता येईल. त्याच बरोबरच देना बँक व विजया बँकेत देखील रोख रक्कम जमा करता येईल. तथापी या शाखामधून ही रोख रक्कम NEFT द्वारे बँक कर्मचारी यांचे कडून व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) जमा करणेत येईल. त्यासाठी या जमा पावतीवर न चुकता तलाठी यांनी ज्या साजेची रक्कम जमा करायची आहे त्या साजेचा व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) व IFSC CODE – BARB0STAPOO नमूद करावा. (IFSC CODE मधील पाचवे अक्षर शून्य आहे) सदरची रक्कम जमा करण्यासाठी तलाठी यांचे कडून बँक कोणेही अधिकचे शुल्क आकारणार नाही.
१ब) ऑनलाईन भरणा – कोणत्याही तलाठी यांना कोणत्याही बँक खात्यावरून इंटरनेट बँकिंग सुविधा वापरुन (NEFT/IMPS) ऑनलाईन भरणा करता येईल. बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक इंटरनेट बँकिंग साठी कोणतेही जादा शुल्क आकारणार नाही मात्र या साठी अन्य बँका ज्या त्या बँकेच्या धोरणाप्रमाणे अधिकचे शुल्क आकारले जावू शकते. त्यामुळे शक्यतो अन्य बँक खात्यावरून ऑनलाईन भरणा टाळावा. त्यासाठी आपल्या साजाचा VAN व IFSC CODE – BARB0STAPOO (IFSC CODE मधील पाचवे अक्षर शून्य आहे) हा वापरावा.
३. व्हर्चुअल अकौंट नंबर VAN) द्वारे जमा रकमेचा अभिलेख वितरण प्रणाली (DDM) प्रमाणे देय रकमेचा ताळमेळ घेणे क्षेत्रीय अधिकारी यांना शक्य होणार आहे. त्यासाठी अभिलेख वितरण प्रणाली मधील जमा पावती / चलन वर ई फेरफार प्रणालीतील जे साजे तयार झाले आहेत त्या साजेंचे नावाप्रमाणे व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) व IFSC CODE प्रिंट होवूनच येईल. त्यामुळे कोणत्या तलाठी साजाची किती नक्कल फी देय आहे? व किती जमा केली आहे? ह्याचा ताळमेळ घेणे सुलभ होणार आहे.
४. पुढील काळात अभिलेख वितरण प्रणाली (DDM) व व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) चा ऑनलाईन ताळमेळ (reconcilation) करण्याचा देखील प्रयत्न करणेत येईल.
५. तलाठी स्थरावरून अभिलेख वितरण प्रणालीतून (DDM) माहे मार्च २०२० या महिन्यात वितरीत केलेल्या अभिलेखांची एप्रिल २०२० मध्ये जमा करावयाची नक्कल फी स्टेट बँकेत न जमा करता बँक ऑफ बडोदा मधील या व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) चा वापर करून जमा करावी. माहे फेब्रुवारी २०२० पर्यंतची ची काही रक्कम जमा करावयाची राहिली असल्यास ती रक्कम स्टेट बँकेतच जमा करावी.
६. तलाठी यांचे कडून व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) द्वारे रक्कम जमा करून घेण्यासाठी बँक ऑफ बडोदा यांनी बँक कर्मचारी व अधिकारी यांनी Diginext (collection module) वापरून करावयाचे कार्यवाही साठी दिनांक ३०.११.२०१९ अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्याची प्रत सोबत महितीसाठी जोडली आहे. या बाबत सुरुवातीचे काळात कोणतीही अडचण येवू नये म्हणून बँकेच्या या मार्गदर्शक सुचणेची प्रत तलाठी यांनी बँकेत जाताना सोबत न्यावी. तरीही काही अडचण आल्यास राज्य समन्वयक अथवा बँक प्रतींनिधी म्हणून श्री. निरव ओझा Manager Pune City Region यांचेशी (email ID [email protected] ) संपर्क साधता येईल.
७. सन २०१९-२० या वित्तीय वर्षात तलाठी यांनी जमा करावयाची व जमा केलेली नक्कलफी चा ताळमेळ घेवून सर्व डी.डी.ई. यांनी आपल्या जिल्ह्याचा अहवाल तातडीने जिल्ह्याधिकारी यांचे मान्यतेने इकडे सदर करावा.
सदरच्या सर्व सूचना सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती.
मा. जमाबंदी आयुक्त सो. यांचे मान्यतेने . स्वाक्षरीत
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
(मा.रामदास जगताप यांच्या ब्लॉग वरुन साभार !)