Spread the love

मित्रहो,

तलाठी यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,१९६६ चे कलम १४९  नुसार अधिकार संपादन केल्याचे प्रतिवृत्त मिळाल्यानंतर  किंवा कलम १५४ अन्वये किंवा कोणत्याही जिल्हयाधिकार्‍याकडून मिळालेली संपादनाची किंवा हस्तांतरणाची कोणतीही माहिती मिळाल्यानंतर तलाठी  यांनी कलम १५० चे उपकलम २ अन्वये आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम,१९७१ मधील नियम १४ अन्वये नमुना ९ मधील नोटीस सर्व हितसंबंधितांना बजाविणे आवश्यक आहे.

सदर नमुना ९ ची नोटीस ई-फेरफार ऑनलाइन पद्धतीने कशी तयार करावी याबाबत तलाठी श्री. महादेव दाणे अप्पा यांनी विडियो तयार केला आहे. सदर विडियो संपूर्ण  पाहिल्यावर तलाठी मित्रांना नमुना ९ ची नोटीस कशी तयार करावी याबाबत काही शंका राहणार याची खात्री आहे.