Spread the love

माहे मे २०२० चे चलन तयार करून VAN द्वारे नक्कल फी जमा करणे बाबत

विषय –    माहे मे २०२० चे चलन तयार करून VAN द्वारे नक्कल फी जमा करणे बाबत                                           

माहे मार्च २०२० मध्ये अभिलेख वितरण प्रणालीतून (DDM) वितरीत केलेल्या नकलांची माहे एप्रिल मध्ये शासन जमा करावयाची नक्कल फी VAN द्वारे (बँक ऑफ बडोदा) जमा करणे बाबत दि. /४/२०२० रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेचे अवलोकन होण्यास विनंती आहे.

    अशा पद्धतीने जमा केलेल्या रकमांचा ऑनलाईन ताळमेळ घेण्यासाठी DDM प्रणालीत काही मुलभूत बदल केले आहेत ते आपण समजून घेणे आवश्यक आहेत .

कोणताही संगणकीकृत गा.न.नं.७/१२, गा.न.नं.८अ आणि फेरफार उतारा तलाठी यांचे स्थरावरून वितरीत करण्यासाठी अभिलेख वितरण प्रणाली (DDM) विकसित करून मार्च२०१९ पासून क्षेत्रीय स्थरावर वापरात आहे. तलाठी स्थरावरून अशा प्रकारे वितरीत होणाऱ्या अधिकार अभिलेखांची नक्कल फी व त्यामधील तलाठी आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयाचा (महाभूमी) हिस्सा दि. ३१ जानेवारी, २०१९ च्या संदर्भीय  शासन निर्णयान्वये निश्चित करून स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेजरी शाखा, पुणे येथील खाते क्रमांक – 38306827364  IFSC कोड न.- SBIN0001904 वर जमा करत होते तथापि याप्रमाणे भरलेल्या रकमांचा दरमहा ताळमेळ घेण्यासाठी रक्कम भरलेल्या पावत्यांच्या झेरॉक्स प्रती घेवून त्याचा ताळमेळ घेण्याचे काम संबंधित तालुक्याचे नायब तहसीलदार / तहसीलदार यांना करावे लागेत होते. त्यामध्ये तंत्रज्ञानाचा सहभाग घेवून हे ताळमेळ घेण्याचे काम सुलभ होण्यासाठी राज्यातील सर्व साजांसाठी  बँक ऑफ बडोदा मध्ये व्हर्चुअल अकौंट (VAN) उघडण्यास शासनाने दिनांक २७.२.२०२० च्या संदर्भीय शासन निर्णयान्वये अनुमती दिली आहे.

           व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) ही फक्त रक्कम हिशोबित करण्यासठीची सोय आहे. या खात्यावर जमा केलेली रक्कम थेट जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख यांचे नावे बँक ऑफ बडोदा, स्टेशन रोड शाखा, पुणे येथिल जमा खात्यावरच (depository account) जमा होणार आहे. तथापि यामुळे फक्त कोणत्या साजेची किती रक्कम जमा झाली? हे ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे. ही सुविधा ताळमेळ अहवाल या शिर्षाखाली उपलब्ध देखील करून दिली आहे.

१.    मार्च २०२० नंतर सर्वच तलाठी यांना VAN खात्यावर बँक ऑफ बडोदा मध्येच रक्कम जमा करावी लागेल .

२.    फेब्रुवारी २०२० पर्यंतची काही नक्कल फी अद्याप भरली नसल्यास ती स्टेट बँक ऑफ इंडिया , पुणे शाखा येथील जुन्या चलना मध्ये नमूद खात्यावरच जमा करावी .

३.    प्रत्येक तालुक्यातील नायब तहसीलदार ई फेरफार तथा डी बी ए यांना आपल्या तालुक्यात अधिसूचित व कार्यरत तलाठी साजे व महसूल मंडळे तयार करून UC मध्ये त्याबाबतचे ऑनलाईन प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे त्याशिवाय तलाठी यांना चलन तयार करता येणार नाही. अशा तालुक्यांची संख्या ५३ आहे त्याची यादी सोबत जोडली आहे . त्या तालुक्याचे नायब तहसीलदार यांनी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तत्काळ करावी.

४.    जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून प्रत्येक तलाठी साजा साठी एक  Virtual Account Number (VAN) करून दिला जाईल व तो थेट तलाठी यांना चालना मध्ये उपलब्ध होईल.

५.    दिनांक ९ जून २०२० पासून सर्व तलाठी साजा साठी चलन तयार करण्याची सुविधा सुरु केली आहे. परंतु त्यानंतरही चलन तयार होत नसल्यास तलाठी यांनी तसे DBA यांना कळवावे.

६.    ज्या तलाठी यांना चलन तयार करताना VAN तयार झालेले नाही VAN तयार करण्यासाठी नायब तहसीलदार (DBA) यांचेशी संपर्क साधावा असा मेसेज येत असल्यास तसे DBA यांना सांगावे DBA अशा साजा ची यादी करून (जिल्हा तालुका साजा चे नाव सेन्सस कोड) हेल्प डेस्क यांना मेल वर पाठवावी त्यांना जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून VAN तयार करून तसे कळवले जाईल त्यानंतरच या साजा चे चलन तयार करून नक्कल फी जमा करता येईल. अशा  साजेंची संख्या १७१० आहे त्याची यादी सोबत जोडली आहे ती यादी DBA यांनी तपासून खात्री करावी

७.    ज्या तलाठी यांनी माहे मार्च किंवा एप्रिल चे चलन तयार करून नक्कल फी बँक ऑफ बडोदा किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे जमा केले असतील तरीही ती रक्कम जमा झालेली नाहीये असे गृहीत धरून पुन्हा मे २०२० चलनात समाविष्ट करून चलन तयार होत असल्यास अशा तलाठी यांनी अशा जमा चलनाची प्रत नायब तहसीलदार (DBA) यांना पाठवावी. DBA यांनी अशा जमा चलनांची खालील नामुण्यात यादी तयार करून हेल्प डेस्क ला पाठवावी . अशा तलाठी यांनी लगेच चलनाची रक्कम जमा करू नये त्यांना चलन दुरुस्त करून दिले जाईल त्यानंतरच अशा तलाठी साजेंची नक्कल फी VAN द्वारे बँक ऑफ बडोदा मध्ये  जमा करावी.
============================================================
DIstrict Taluka Sajja  VAN Month-Year  Challan Amount   Paid Amount  Date of Payment

============================================================

८.    बँक ऑफ बडोदा मध्ये VAN क्रमांक व IFSC कोड वापरून पैसे जमा करण्याचे दोन पर्याय आहेत एक म्हणजे बँक ऑफ बडोदा , देणा बँक व विजया बँकेच्या कोणत्याही शाखेत जावून रोख रक्कम काऊटर वर जावून जमा करणे व दुसरा पर्याय म्हणजे ऑनलाईन पेमेंट करणे.

   

     १अ) बँक काउंटर वरुन भरणा-  बँक ऑफ बडोदा या बँकेच्या कोणत्याही शाखेच्या काउंटरवरुन   थेट रोख रक्कम या खात्यावर जमा करता येईल. त्याच बरोबरच देना बँक व विजया बँकेत देखील रोख रक्कम जमा करता येईल. तथापी देना बँक व विजया बँक या शाखामधून ही रोख रक्कम NEFT द्वारे बँक कर्मचारी यांचे कडून  व्हर्चुअल अकौंट नंबर  (VAN)  जमा करणेत येईल. त्यासाठी या जमा पावतीवर (चलन) प्रिंट झालेला  त्या साजेचा व्हर्चुअल अकौंट नंबर  (VAN)  व IFSC CODE – BARB0STAPOO  नमूद करावा. (IFSC CODE मधील पाचवे अक्षर शून्य आहे) सदरची रक्कम जमा करण्यासाठी तलाठी यांचे कडून  बँक कोणेही अधिकचे शुल्क आकारणार नाही.

      १ब) ऑनलाईन भरणा – कोणत्याही तलाठी यांना कोणत्याही बँक खात्यावरून इंटरनेट बँकिंग सुविधा वापरुन ऑनलाईन भरणा करता येईल.  त्यासाठी देखील कोणतेही अधिकचे शुल्क आकारले जाणार नाही. इंटरनेट बँकिंग सुविधा वापरुन ऑनलाईन भरणा करताना  बँक ऑफ बडोदा मधील खात्यातून पेमेंट करताना payment / transfer पर्यायातून payment using VAN हा पर्याय वापरावा व त्यासाठी आपल्या चलनावर प्रिंट झालेला त्या  साजाचा VAN व IFSC CODE  BARB0STAPOO (IFSC CODE मधील पाचवे अक्षर शून्य आहे)  हा वापरावा. अशा पेमेंट ची स्लीप तलाठी यांनी जपून ठेवावी.

              SBI  या बँकेतील खात्यातून पेमेंट करण्यासाठी payment using VAN हा पर्याय वापरू नये त्याऐवजी नियमित खाते नं हा पर्याय वापरून त्यात VAN नं.  BENEFICIARY मध्ये ADD करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑनलाईन पेमेंट करावे.  व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) द्वारे जमा रकमेचा अभिलेख वितरण प्रणाली (DDM) प्रमाणे देय रकमेचा ताळमेळ घेणे क्षेत्रीय अधिकारी यांना शक्य होणार आहे. त्यासाठी अभिलेख वितरण प्रणाली मधील जमा पावती / चलन वर ई फेरफार प्रणालीतील जे साजे तयार झाले आहेत त्या साजेंचे नावाप्रमाणे व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) व IFSC CODE प्रिंट होवूनच येईल. त्यामुळे कोणत्या तलाठी साजाची किती नक्कल फी देय आहे? व किती जमा केली आहे? ह्याचा ताळमेळ घेणे सुलभ होणार आहे.  

          

                   DDM चलानाप्रमाणे नक्कल फी जमा करताना कोणीही आपल्या साजा चा अचूक VAN क्रमांक वापरल्याशिवाय नक्कल फी जमा करू नये तसेच चलनात नमूद केली असेल ती संपूर्ण रक्कम एकदाच जमा करावी नक्कल फी अंशाता जमा करू नये तसेच एका तलाठी कडे अन्य साजा चा अतिरिक्त कार्यभार असलातरी एकाच VAN क्रमांकावर रक्कम जमा करू नये. तसेच ऑनलाईन पेमेंट भरताना देखील चलनावर छापलेला  VAN क्रमांक व IFSC कोड अचूक नमूद केला आहे ह्याची खात्री करावी. चुकीचा VAN क्रमांक भरून केलेले पेमेंट विचारात घेतले जाणार नाही . ही रक्कम तलाठी यांना पुन्हा भरावी लागेल ह्याची नोंद घ्यावी. 

९.           तलाठी यांचे कडून व्हर्चुअल अकौंट नंबर (VAN) द्वारे रक्कम जमा करून घेण्यासाठी बँक ऑफ बडोदा यांनी बँक कर्मचारी व अधिकारी यांनी Diginext (collection module) वापरून करावयाचे कार्यवाही साठी दिनांक ३०.११.२०१९ अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्याची प्रत सोबत महितीसाठी जोडली आहे. या बाबत सुरुवातीचे काळात कोणतीही अडचण येवू नये म्हणून बँकेच्या या मार्गदर्शक सुचणेची प्रत तलाठी यांनी बँकेत जाताना सोबत न्यावी. तरीही काही अडचण आल्यास  राज्य समन्वयक अथवा बँक प्रतींनिधी म्हणून श्री. निरव ओझा  Manager Pune City Region   यांचेशी (email ID [email protected] ) किंवा हेल्प डेस्क यांचेशी संपर्क साधता येईल.

८.       सन २०१९-२० या वित्तीय वर्षात तलाठी यांनी जमा करावयाची व स्टेट बँकेत जमा केलेली नक्कल फी चा ताळमेळ घेवून सर्व डी.डी.ई. यांनी आपल्या जिल्ह्याचा अहवाल तातडीने जिल्ह्याधिकारी यांचे मान्यतेने इकडे सदर करावा.

          सदरच्या सर्व सूचना सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती.

                                                                                                                                            

                                                                                                                                         (रामदास जगताप)

 राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प

DATE – 10.6.2020