Spread the love

 

विषय-  माहे मे २०२० चे चलन तयार करून VAN द्वारे नक्कल फी जमा करणे बाबत                                           

               माहे मार्च २०२० मध्ये अभिलेख वितरण प्रणालीतून (DDM) वितरीत केलेल्या नकलांची माहे एप्रिल मध्ये शासन जमा करावयाची नक्कल फी VAN द्वारे (बँक ऑफ बडोदा) जमा करणे बाबत दि. २७/५/२०२० रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेचे अवलोकन होण्यास विनंती आहे.

१.    ज्या तलाठी यांनी माहे मार्च किंवा एप्रिल चे चलन तयार करून नक्कल फी बँक ऑफ बडोदा किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे जमा केले असतील तरीही ती रक्कम जमा झालेली नाहीये असे गृहीत धरून पुन्हा मे २०२० चलनात समाविष्ट करून चलन तयार होत असल्यास अशा तलाठी यांनी अशा जमा चलनाची प्रतीसह सोबतच्या लिंकवर माहिती अपडेट करावी त्यानंतर त्यांना चलन दुरुस्त करून सूचना देण्यात येतील त्यानानातर या तलाठी यांनी पुन्हा चलन तयार करून VAN द्वारे पेमेंट भरणा करावा.

२.    बँक ऑफ बडोदा मध्ये VAN क्रमांक व IFSC कोड वापरून पैसे जमा करण्याचे दोन पर्याय आहेत एक म्हणजे बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँकेच्या कोणत्याही शाखेत जावून रोख रक्कम काऊटर वर जावून जमा करणे व दुसरा पर्याय म्हणजे ऑनलाईन पेमेंट करणे.

   

     १अ) बँक काउंटर वरुन भरणा-  बँक ऑफ बडोदा या बँकेच्या कोणत्याही शाखेच्या काउंटरवरुन  थेट रोख रक्कम या खात्यावर जमा करता येईल. त्याच बरोबरच देना बँक व विजया बँकेत देखील रोख रक्कम जमा करता येईल. तथापी देना बँक व विजया बँक या शाखामधून ही रोख रक्कम NEFT द्वारे बँक कर्मचारी यांचे कडून  व्हर्चुअल अकौंट नंबर  (VAN)  जमा करणेत येईल. त्यासाठी आपले चलन दाखवूनच भरणा करावा. सदरची रक्कम जमा करण्यासाठी तलाठी यांचे कडून  बँक कोणेही अधिकचे शुल्क आकारणार नाही.

      १ब) बँक ऑफ बडोदा खात्यातून ऑनलाईन भरणा  कोणत्याही तलाठी यांना कोणत्याही बँक खात्यावरून इंटरनेट बँकिंग सुविधा वापरुन ऑनलाईन भरणा करता येईल.  त्यासाठी देखील कोणतेही अधिकचे शुल्क आकारले जाणार नाही. इंटरनेट बँकिंग सुविधा वापरुन ऑनलाईन भरणा करताना  बँक ऑफ बडोदा मधील खात्यातून पेमेंट करताना payment / transfer पर्यायातून payment using VAN हा पर्याय वापरावा व त्यासाठी आपल्या चलनावर प्रिंट झालेला त्या  साजाचा VAN व IFSC CODE  BARB0STAPOO (IFSC CODE मधील पाचवे अक्षर शून्य आहे)  हा वापरावा. अशा पेमेंट ची स्लीप तलाठी यांनी जपून ठेवावी.

    १क) SBI या बँकेतील खात्यातून ऑनलाईन भरणा – स्टेट बँक ऑफ इंडिया च्या खात्यातून पेमेंट करण्यासाठी payment using VAN हा पर्याय वापरू नये त्याऐवजी अन्य बँकाचे खाते नं. ( other bank beneficiary) हा पर्याय वापरून त्यात VAN नं.  BENEFICIARY मध्ये ADD करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑनलाईन पेमेंट करता येईल. 

 

 

 DDM चलानाप्रमाणे नक्कल फी जमा करताना कोणीही आपल्या साजा चा अचूक VAN क्रमांक वापरल्याशिवाय नक्कल फी जमा करू नये तसेच चलनात नमूद केली असेल ती संपूर्ण रक्कम एकदाच जमा करावी नक्कल फी अंशाता /अपूर्ण किंवा चुकीची जमा करू नये तसेच एका तलाठी याचेकडे अन्य साजा चा अतिरिक्त कार्यभार असलातरी एकाच VAN क्रमांकावर रक्कम जमा करू नये. तसेच ऑनलाईन पेमेंट भरताना देखील चलनावर छापलेला  VAN क्रमांक व IFSC कोड अचूक नमूद केला आहे ह्याची खात्री करावी. चुकीचा VAN क्रमांक भरून केलेले पेमेंट विचारात घेतले जाणार नाही. ही रक्कम तलाठी यांना पुन्हा भरावी लागेल ह्याची नोंद घ्यावी. 

        

      DDM अहवाल प्रमाणे सन २०१९-२० च्या जमा नक्कल फी चे लेखापरीक्षण करणे –

          माहे फेब्रुवारी २०२० अखेरची  सन २०१९-२० या वित्तीय वर्षात तलाठी यांनी जमा करावयाची नक्कल फी व स्टेट बँकेत जमा केलेली नक्कल फी चा ताळमेळ घेवून सर्व डी.डी.ई. यांनी आपल्या जिल्ह्याचा अहवाल तातडीने जिल्ह्याधिकारी यांचे मान्यतेने इकडे सदर करावा. MIS अहवाला प्रमाणे तालुका निहाय सदरची संपूर्ण रक्कम खात्यावर जमा झाल्याचे प्रमाणपत्र तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना सादर करणे आवश्यक आहे. 

            कोणत्याही तालुक्यात कोणत्याही तलाठी साजा किंवा महसूल गावची नक्कलफी जमा केली नसल्यास सदरची सर्व नक्कल फी तात्काळ जमा करून माहे फेब्रुवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२० या १३ महिन्याची संपूर्ण नक्कल फी स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेजरी शाखा, पुणे  येतील खालील खात्यावर जमा झाली असल्याचे लेखा परीक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल जमाबंदी आयुक्त कार्यालयाला सादर करावा.  

Bank Details –

 

Current Account No. 38306827364

IFSC.Code. No- SBIN0001904

Name – Settlement Commissioner and Director of Land Record

 ( Maharashtra State) Pune

Bank – State Bank of India, Treasury Branch, Pune-1.

 

          सदरच्या सर्व सूचना सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती.

                                                                                                                                    स्वाक्षरीत

  दिनांक १५.६.२०२०                                                                                             (रामदास जगताप)

                                                                                                              राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प