कोव्हिड १९ या सार्वत्रिक साथीशी संबंधित कर्तव्ये इतर विभागातील कर्मचारी यांचेसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी अथकपणे पार पाडत आहेत. दुर्दैवाने एखाद्या कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देणेबाबत वित्त विभागाने दिनांक २९ मे,२०२० रोजी शासन निर्णय जाहीर केलेला आहे.
शासन निर्णय दिनांक २९ मे,२०२० वाचा
अश्या मयत कर्मचारी यांचे कुटुंबास सानुग्रह मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनस पाठविणेकामी मा. अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थपन प्राधिकरण,जळगाव तथा जिल्हाधिकारी,जळगाव यांनी तहसिलदार(महसूल),जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक केलेली असून त्याबाबत आदेश जारी केलेला आहे.