Spread the love

 

आज दिनांक १ ऑगस्ट ! आज महसूल दिन !

सर्वप्रथम महसूल विभागातील सर्व कर्मचारी यांना महसूल दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

शासनाचा कणा म्हुणून काम करणार्‍या महसूल विभागाची सुरुवात ही जरी जमीन महसूल गोळा करणारा आणि कायदा व सुव्यवस्था राखणारा विभाग म्हणून झालेली असली तरी सध्या लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीच्या निवडणूका निर्वेधपणे पार पाडणे,गौणखनिज स्वामित्वधन वसूली व दंडात्मक कारवाई करणे,जनगणना,कृषि गणना,आर्थिक व सामाजिक गणना,रोजगार हमी योजना राबविणे,विविध सामाजिक अर्थसाहाय्य योजना-जसे संजय गांधी निराधार योजना ,इंदिरा गांधी वृद्धापकाळ/विधवा योजना ची अंमलबजावणी करणे,जात प्रमाणपत्र जारी करणे,विविध दाखले जसे-ऐपत प्रमाणपत्र,रहिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,शेतकरी दाखला,भूमिहीन मजूर इ. सह इतर प्रमाणपत्रे नागरिकास देणे,टंचाई,अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्ती काळात नागरिकांचा जीव वाचवून त्यांना मदत मिळवून देणे,विविध अनुदानांचे वाटप  या व इतर अनेक प्रकारची कामे महसूल विभागाकडून अविरतपणे पार पाडली जात आहेत. तसेच शासनाची कोणतीही नवीन योजना आली किंवा अभियान आले तरी त्यात महसूल विभागाचा सिंहाचा वाटा हा असतोच !

जसे अलिकडील प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 

 

नुकतेच कोविड-१९ या महामारीच्या काळात आरोग्य विभागासोबत खांद्याला खांदा लावून लढले ते महसूल विभागाचे कर्मचारीच ! या दरम्यान या संसर्गाबद्दल जनजागृती , कोविड केअर सेंटर उभारणी ,नियमित धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत तांदूळ वाटप इ. कामे सुद्धा अथकपणे पार पाडली.

जसे १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष; तसेच १ ऑगस्ट ते ३१ जुलै हे महसूल वर्ष. या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी व वसुली यांचा ताळमेळ घेण्याचे काम महसूली  यंत्रणेकडून केले जाते. त्यामुळे प्रत्येक नवे महसूल आकारणी व वसुलीचे उद्दिष्ट घेऊन राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालयांच्या अधिनस्थ  कार्यरत महसूलचे अधिकारी, कर्मचारी नव्या जोमाने काम करत असतात. दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणार्‍या या यंत्रणेतील  कार्यरत अधिकार्‍यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून उतराई होण्याची संधी शासनाला मिळावी म्हणून दरवर्षी १ ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जावा, अशी संकल्पना पुढे आली. या संकल्पनेत महसूलच्या कार्यरत यंत्रणेला पुढील उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी ऊर्जा मिळणारे काम महसूलदिनी व्हावे, हे उद्दिष्ट डोळ्य़ासमोर ठेवून राज्य शासनाने १९ जुलै २००२ रोजी महसूल दिन आयोजनासंदर्भात पहिले परिपत्रक काढले. या परिपत्रकानंतर महसूल दिन साजरा करणे सुरु झाले.

आजचा महसूल दिन हा जिल्हा स्तरावर उत्कृष्ट काम करणारे अपर जिल्हाधिकारी ते कोतवाल पदापर्यंत कार्यरत असलेले  कर्मचारी यांचा गौरव करणे, महाराजस्व अभियानाची सुरुवात करणे,गत ५ वर्षात शासनाच्या विविध कायदे/नियमावली मध्ये झालेल्या सुधारणा यांची प्रसिद्धी करणे व शासन व शासनाच्या कामांबाबत जनतेमध्ये विश्वास वाढविणे हे उद्दिष्ट ठेवून शासनाने दिनांक २४ जुलै,२०२० रोजी परिपत्रक जारी केलेले आहे.

परिपत्रक

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download