श्रमिक ट्रेन व अन्य रेलवे सुरू झाल्या नंतर देशाच्या इतर भागातून नागरिक जळगाव जिल्ह्यात यायला सुरुवात होणार आहे. अशा वेळी सार्वजनिक आरोग्याची घ्यायच्या काळजी बाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना वा STANDARD OPERATING PROCEDURES (SOP) जारी करण्यात आलेल्या आहे. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात येणार्या प्रवाशांची तपासणी करणे,प्रवासाची व्यवस्था करणे इ. बाबींची जबाबदारी त्या त्या स्थानिक स्वराज संस्थांकडे देण्यात आलेली आहे. त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्यांचे कार्यक्षेत्राचे incident commanders यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावायची आहे. याबाबत अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी आदेश जारी केला आहे.
शासन निर्णय , आदेश आणि SOP