सध्या कोरोना विषाणू च्या साथीने सर्वत्र थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर ज्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पद हे राजीनामा किंवा इतर कारणामुळे रिक्त झाले त्यांची निवडणूक घ्यावी किंवा कसे याबाबत ग्रामविकास विभाग,महाराष्ट्र शासन यांनी दिनांक १२ मे २०२० च्या पत्राने सर्व जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शन केले आहे.
त्यानुसार सदर रिक्त पदांची निवडणूक घेण्यासाठी ग्रामपंचायतींची विशेष सभा/बैठका घेण्यास परवानगी देण्यात आलेले आहे. परंतु सदर बैठका घेतांना शासनाने कोव्हिड -१९ साथीच्या बाबत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे.
ग्रामविकास विभाग यांचेकडील पत्र व म. उपजिल्हाधिकारी,महसूल प्रशासन यांचेकडील पत्र