दरवर्षी १ ऑगस्ट महसूल दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. महसूल विभागात कोतवाल ते अपर जिल्हाधिकारी पदापर्यंत कार्यरत उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी यांचा या दिवशी गौरव केला जातो. शासनाच्या निर्देशाप्रमाणे गौरवार्थी कर्मचारी यांची निवड केली जाते.
यावर्षी जळगाव जिल्ह्यात उत्कृष्टपणे आपल्या सेवेतून आपल्या कर्तव्याचा ठसा उमटविणारे तलाठी व तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी यांची इतर कर्मचारी यांचेसोबत निवड करण्यात आलेली आहे.
त्यात उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून जनार्दन बंगाळे भाऊसाहेब,मंडळ अधिकारी, फैजपूर भाग आणि योगिता योगेश पाटील यांची

तर उत्कृष्ट तलाठी म्हणून राहुल पवार,तलाठी भडगाव आणि निशिकांत पाटील ,तलाठी पारोळा यांची सार्थ निवड झाली आहे.


आपले सर्वांचे यश उर्वरित बंधू भगिनीसाठी निश्चितीच प्रेरणादायी राहील.
आपणा सर्वांना भावी वाटचालीसाठी talathimitra.com तर्फे हार्दिक शुभेच्छा !!!