Spread the love

जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2019- 2020 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आईवडील, शेतकऱ्याची पती- पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही 1 व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांना ही योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे. तसेच 2019- 2020 या वर्षाकरीता अपघातग्रस्त शेतकऱ्यास, त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता असून सहभागी होण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2020 आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.


शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजचा शॉक बसणे, इत्यादि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहीना अपंगत्व येते, घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशावेळी –
अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 2.00 लाख, अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय तसेच 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु. 2.00 लाख इतकी नुकसान भरपाई अनुज्ञेय राहील. अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास रु. 1.00 लाख इतकी नुकसान भरपाई अनुज्ञेय राहील.
आपल्या भागातील एकाद्या वहितीधारक शेतकऱ्यांचा अथवा त्याच्या कुटूंबातील सदऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याच्या वारसदारास नुकसान भरपाई देय राहील, “ तरी या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे” तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालय ( सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव/ पाचोरा/ अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव आकाशवाणी शेजारी प्रशासकीय इमारत, जळगाव. विमा कपंनी- दि. युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरंन्स कंपनी लि. पुणे -40, विमा सल्लागार कंपनी – जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. नागपूर, दुरध्वनी 0712-6731210/215 टोल फ्री नं. 1800 233 3533, ई मेल [email protected], वेब साईट – www.jaika.in.  यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संभाजी ठाकूर, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

banner

 

 

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेली कोणतेही १ सदस्य आई – वडील , शेतकऱ्याची पती / पत्नी , मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे १० ते ७५ वयोगातील एकुण दोन जणांना अपघाती विमा संरक्षण .
अ.क्र. अपघाताची बाब नुकसान भरपाई
१. अपघाती मृत्यु रू.२,00,000
२. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे रू.२,00,000
३. अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे रू.२,00,000
४. अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे रू.१,00,000
रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडुन मृत्यु, विषबाधा, विजेचा धक्का, विज पडुन मृत्यु, सर्पदंश, विंचुदंश, खुन, उंचावरून पडुन मृत्यु, नक्षलवाद्यांकडुन होणा-या हत्या, जनावरांच्या हल्ल्यांमुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यु, दंगल इत्यादींमुळे होणा-या अपघाती घटनांमुळे शेतक-यांस मृत्यु किंवा अपंगत्व आल्यास विम्याद्वारे आर्थिक लाभ मिळु शकतो
  • तालुका कृषी अधिकारी पत्र ( मृळ प्रत ),
  • दावा अर्ज
  • वारसदाराचे बॅंन्क खाते पुस्तक ( झेराॅक्स )
  • घोषणापत्र ‘अ ‘ व ‘ब ‘
  • वयाचा दाखला(मतदान कार्ड/पॅन कार्ड/वाहन परवाना/जन्माचा दाखला/पासपोर्ट/शाळेचा दाखला)साक्षांकित केलेली झेराॅक्स प्रत जोडावी
  • ७/१२, ६ क, ६ ड
  • मृत्यु प्रमाणपत्र
  • प्रथम माहिती अहवाल (एफआयआर )अकस्मात मृत्युची खबर
  • घटनास्थळ पंचनामा
  • इन्क्वेस्ट पंचनामा (मरणोत्तर पंचनामा)
  • पोस्टमाॅर्टम रिपोर्ट ( शवविच्छेदन अहवाल)
  • वाहन चालविण्याचा वैध परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स )
  • व्हिसेरा रिपोर्ट
  • अपंगत्वाचा दाखला व फोटो
शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेल्या व्यक्तीस दावा करण्यास लागणारी कागदपत्र
  • ज्या शेतकऱ्याचा वहिती खातेधारक म्हणुन नोंद आहे त्याचा वारस म्हणुन प्रस्ताव सादर करतोय त्या शेतकऱ्याचा ७ /१२ उतारा, ६ ड (जुना फेरफार).
  • शासननिर्णयनुसार अपघाता संबंधी सर्व लागणारी कागदपत्रे जशीच्या तशी.
  • शिधापत्रिका ( रेशनकार्ड ) शेतकऱ्याचे वरसाशी नाते स्पष्ट करणारी कागदपत्रे ( पुरावा ).
  • इतर संबंधीत दाव्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र अटी व शर्ती लागु

अधिक माहितीसाठी भेट द्या

http://jaika.in/shetkarivimayojana.html