Spread the love

 

मित्रहो,जमीन महसूल वसूली हे तलाठी यांचे प्रमुख कर्तव्यापैकी एक महत्वाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 मध्ये प्रकरण 11 मधील कलम 168  ते 213 यामध्ये मागणी व वसूली,थकबाकी वसूलीची कार्यपद्धती,जप्ती,जप्त मालमत्तेची विक्री इ. बाबत कार्यपद्धत निश्चित करण्यात आलेली आहे. सदर कार्यपद्धतीचे नियमन महाराष्ट्र जमीन महसुलाच्या वसुलीबाबत नियम,1967 अन्वये  केले जाते. शासनाकडून दरवर्षी वसूलीचे उद्दिष्ट दिले जाते. त्या अनुषंगाने आपण वसूलीचे निरनिराळे स्त्रोत शोधून व विहित पद्धतीने वसूली करून शासनाच्या खजिन्यात रकमा जमा करतो. मागील 5 ते 6 वर्षांमध्ये शासनाने वेगवेगळ्या अधिनियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. परंतु या सुधारणांच्या अभ्यासाअभावी  वसूली वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाच्या स्त्रोतांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे.

हीच बाब लक्षात घेऊन फैजपूर उपविभागात वसूली संबंधी अद्ययावत कायदे व नियम याबाबत सखोल प्रशिक्षणाचे   श्री जनार्दन बंगाळे भाऊसाहेब ,मंडळ अधिकारी,फैजपूर भाग यांनी समजण्यास अतिशय  सोपे व सुंदर सादरीकरण केले आहे.

सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना उपयुक्त असे या प्रशिक्षणाचे सादरीकरण  श्री बंगाळे भाऊसाहेब यांनी उपलब्ध करुन दिल्याबद्दल talathimitra.com तर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद !!!

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download