Spread the love

स्वातंत्र्यदिनी तलाठी मित्र वेबसाईटचा शुभारंभ करताना आम्हांला आनंद होत आहे. सदर वेबसाईट निर्मितीसाठी श्री.विष्णू  पाटील (मं.अधिकारी), श्री. महादेव दाणे (तलाठी,ता.बोदवड) व मी बालाजी लोंढे (तलाठी ता.धरणगांव) आम्ही खुप दिवसांपासून आपल्या तलाठी, मं.अधिकारी यांच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेबसाईट तयार करण्याच्या विचारात होतो. यासाठी सर्वाधिक पुढाकार घेतला विष्णू  भाऊसाहेबांनी !
अगदी Domain Name, Web Hosting त्यांनी स्वखर्चाने विकत घेतली. वेबसाईटचा बेसीक आराखडा तयार झाल्यानंतर प्रश्न होता तो तलाठी व मं.अधिकारी यांना नेहमी उपयुक्त पडणाऱ्या कंन्टेटचा ! नवनवीन विचार आणि त्याचे वेबसाईटमध्ये Implementation करणे यावर बराच वेळ खर्ची पडला . सतत बदल करत चुकत चुकत शिकत गेलोत. यासाठी आम्हांला श्री.तुषार भांबरे (https://onlinetushar.com/)यांची टेक्नीकल मदत मोलाची ठरली.
लॉकडाऊनच्या काळात वेबसाईटची उपयुक्तता अधिकाधिक वाढवण्यासाठी रिकामा वेळ कामी आला. अनेकदा तलाठी किंवा मं.अधिकारी यांना वेगवेगळे  शासन निर्णय, परिपत्रके, दैनंदिन कामकाजासंदर्भात विविध नमुने यांचा उपयोग करावा लागतो आणि नेमक्यावेळी या गोष्टी उपलब्ध होत नाहीत. मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये save असेल तरीदेखील ते शोधणे अवघड होऊन जाते. शासकीय किंवा खाजगी वेबसाईटवर जाऊन शोध घेणे जिकरीचे आणि वेळखाऊ ठरते. मग ज्यांच्याकडे अशा माहितीचा साठा आहे त्यांना फोन लावून Whatsapp च्या माध्यमातुन माहिती मिळवळी जाते. ही अडचण लक्षात घेवून

आम्ही PDF LIBRARY PAGE च्या माध्यमातून किंवा उपयुक्त नमुने या पेजच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती, डेटा आपल्याला सहज उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. श्री. महादेव दाणे (तलाठी,ता.बोदवड)  यांची पूर्वपरवानगी घेवून त्यांच्या तलाठी मित्र या You Tube Channel च्या स्वतंत्र link देत आहोत. याचा नवीन  नियुक्त तलाठी यांना उपयोग होईल.

आपले जे तलाठी बांधव उत्तम, नाविण्यपूर्ण काम/कर्तव्य करत आहेत त्यांचे काम इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू जेणेकरुन इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळेल तसेच तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक करण्यासाठी जाणीपूर्वक काम करु.

सध्या तरी आपल्याला फक्त जळगांव जिल्हयामधील पोस्ट दिसतील. भविष्यात नाशिक विभाग आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र असा या वेबसाईटचा विस्तार करण्याचा उद्देश आहे. आम्हांला आपल्याकडून सदर वेबसाईटच्या उपयोगितेच्या संदर्भात सूचना अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रिया आम्हांला अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतील !

आपला तलाठी मित्र -बालाजी लोंढे