Spread the love

 

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दरवर्षी ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून त्यांच्या मत्ता व दायित्वे ची विवरणपत्रे दरवर्षी दिनांक ३१ मे पर्यंत सादर करावयाची असतात. परंतु या वर्षी कोव्हिड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सदर विवरणपत्रे सादर करण्याची मुदत दिनांक ११ मे,२०२० च्या शासन निर्णयानुसार दिनांक ३१ ऑगस्ट,२०२० पर्यंत वाढविण्यात आलेली होती.

शासन निर्णय दिनांक ११ मे,२०२० पहा 

 

सदर मुदत आता संपत आली असल्याने सर्वांनी आपली मत्ता व दायित्व विवरणपत्रे आस्थापना शाखेकडे सीलबंद लिफाफ्यात जमा करावे.

सदर विवरण प्रपत्रे १,२ व ३ हे MS EXCEL फाइल मध्ये कोरा नमुना म्हणून पुढीलप्रमाणे उपलब्ध करुन दिलेले आहे. आपण दरवर्षी हा नमुना भरून संगणकीय प्रती मध्ये आपलेकडे जतन करुन ठेवल्यास पुढील वर्षी सदर प्रपत्रे भरताना आपल्याला सोपे जाईल अशी आशा आहे.

डाऊनलोड ⇒           मत्ता व दायित्वे विवरणपत्रे