Spread the love

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत एप्रिल ते जून महिन्याचे धान्य वाटप प्रमाण जाहीर !


जळगाव. दि. 17 (जिमाका) – प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना कार्डधारकांना प्रति सदस्य 5 किलो मोफत तांदूळ देण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यास मोफत द्यावयाचा 14083 एवढा मे. टन तांदुळ प्राप्त झालेला आहे. तो जिल्ह्यातील एकूण 1939 स्वस्त धान्य दुकांमधून अंत्योदयच्या 5 लाख 85 हजार 835 कार्डधारकलाभार्थीना वितरित करण्यात येणार आहे.
तर मोफत 1158 मे.टन एवढा तांदुळ 22 लाख 30 हजार 773 लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

माहे मे आणि जून 2020 मध्ये एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन एनपीएच किंवा ऑफलाईन धान्य प्रति व्यक्तीस 5 किलो प्रमाणे धान्य मिळणार  आहे. यामध्ये गहू रुपये 8 रुपये किलोप्रमाणे प्रतिव्यक्ती 3 किलो, तांदूळ 12 किलो या दराने प्रतिव्यक्तीस 2 किलो प्रमाणे धान्य मिळणार आहे.

तथापि ज्यांचे नांव युनिट रजिष्टरला नाही अशांना धान्य मिळणार नाही. असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.